Hadapsar Pune Crime News | पुणे : ऊसतोड कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण

10th June 2024

पुणे : – Hadapsar Pune Crime News | ऊसतोड कामगार पुरवणाऱ्या ठेकदाराचे अपहरण (Kidnapping Case) केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वा पाच वजण्याच्या सुमारास हडपसर येथील मंत्री मार्केट (Mantri Market Hadapsar) परिसरात घडली आहे.

राजेंद्र चव्हाण असे अपहरण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी बप्पा (रा मुदगड, लातुर पूर्ण नाव माहित नाही), विक्रम जाधव (रा. अंबुलगा, लातुर) व त्यांचे इतर दोन साथीदार यांच्यावर 367, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरेखा राजेंद्र चव्हाण (वय-37 रा. गवळीवस्ती, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा चव्हाण यांचे पती राजेंद्र चव्हाण ठेकेदार आहेत. ते शेतकऱ्यांना ऊसतोड कामगार पुरवितात. बप्पा याने राजेंद्र यांना ऊसतोड कामगार पुरविण्यासाठी तीन लाख रुपये दिले होते. मात्र, राजेंद्र यांनी ऊसतोड कामगार पुरवले नाहीत. त्यामुळे आरोपी राजेंद्र यांच्यावर चिडले होते. हडपसर भागातील मंत्री मार्केट परिसरातून राजेंद्र यांना मारहाण करुन आरोपींनी धमकावले. त्यांनी चारचाकी गाडीत घालून आरोपी पसार झाले. आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला अज्ञात ठिकाणी डांबून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.