Pune PMC News | पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर पूरग्रस्त वसाहतींच्या अवैध बांधकामांचा तीन पट मिळकत कर रद्द करावा; माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांची महापालिकेकडे मागणी

0

पुणे : Pune PMC News | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील पूरग्रस्त वसाहतीतील व अन्य भागातील अवैध बांधकामांना (Illegal construction In Pune) आकारण्यात येणारा तीन पट मिळकत कर रद्द करावा, अशी मागणी माजी नगरसेवक दत्ता बहिरट (Datta Bahirat) यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

महापालिकेच्या हद्दीत पूरग्रस्त वसाहती आहेत. शासनाने महापालिकेच्या माध्यमातून या वसाहतींमध्ये पानशेत पूरग्रस्तांचे पुनर्वसन केले आहे. मागील साठहून अधिक वर्षात कुटुंबातील सदस्यांची वाढत गेली तसे येथील नागरिकांनी दोन तीन मजली घरांचे बांधकाम केले. या बांधकामांना महापालिकेकडून तीन पट कर आकारण्यात येत आहे. हा कर रद्द करण्यासाठी माजी नगरसेवक दत्ता बहिरट सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशातच २०२२ मध्ये राज्य शासनाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अवैध बांधकामांना आकारण्यात येणार्‍या मिळकत करावरील शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर बहिरट यांनी पूरग्रस्त वसाहतींचाही तीन पट कर शास्ती कर माफ करावा यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

बहिरट यांच्या अर्जावर महापालिकेच्या विधी विभागाने देखिल सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी प्रशासन करत नाही. मात्र, अतिरिक्त आयुक्तांनी याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागावे असे वाटते अशी टिपण्णी करून अभिप्राय नाकारला आणि प्रस्ताव दप्तरी दाखल केला आहे. कर संकलन विभागाने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाचा नागरिकांना मोठा मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, असे बहिरट यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.