Pune Crime News | पुणे : हातपाय बांधुन दुकानातील महागडे मोबाईल चोरणारे त्रिकूट गजाआड, विश्रामबाग पोलिसांची कारवाई; 20 लाख 56 हजारांचा ऐवज जप्त

0

पुणे : – Pune Crime News | मोबाईल शॉपीमधील तिघांना चाकूचा धाक दाखवून (Robbery Case) त्यांचे हातपाय बांधून दुकानातून आयफोन, वनप्लस, सॅमसंग कंपनीचे महागडे मोबाईल चोरून नेणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) अटक करुन 72 तासात गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच गुन्ह्यात चोरलेला 20 लाख 56 हजार 992 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

झबीउल्लाह नबीउल्लाह खान (वय-28 रा. आझाद नगर, घाटकोपर, मुंबई), सोहेल अय्युब शेख (वय-20 रा. खारदांडा, खारवेस्ट, मुंबई), कमलेश विश्वास मोरे (वय-20 रा. रहाटणी फाटा, थेरगाव, पिंपरी चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात आयपीसी 458, 380, 34 सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी मोबाईल दुकानातील तिघांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून महागडे मोबाईल चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन त्यांचा शोध सुरु केला. आरोपी मुंबई व पुणे प्रवास करत असल्याने त्यांचा शोध लागत नव्हता. दरम्यान, आरोपी कोंढवा परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. तसेच गुन्ह्यात चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करुन 72 तासात गुन्हा उघड केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ, पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार राकेश गुजर, रेवन कंचे, अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, महावीर वलटे, आशिष खरात, राहुल मोरे, सातप्पा पाटील, संतोष शेरखाने, अर्जुन थोरात, नितीन बाबर यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.