Rahul Gandhi | राहुल गांधींना मानहानी प्रकरणात दिलासा

0

कर्नाटक: Rahul Gandhi | वर्तमानपत्रात बदनामीकारक जाहिराती छापल्याच्या आरोपांवरून कर्नाटक भाजपाने दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला आहे. विशेष बंगळुरू न्यायालयाने गांधींना जामीन मंजूर केला आहे.

याबाबतची पुढील सुनावणी ३० जून रोजी असणार आहे. तत्कालीन भाजप सरकारवर २०१९ ते २०२३ च्या दरम्यान वृत्तपत्रात जाहिरात देऊन भाजपावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

राहुल गांधींनी वृत्तपत्रात अपमानास्पद जाहिराती दिल्याचा आरोप करत भाजपने तक्रार केली होती. दरम्यान याबाबत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.

याअगोदर मोदी आडनावावरून केलेल्या आरोपामुळे सुरतच्या कोर्टाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यांनतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व काढून टाकण्याचा आदेश दिला. नियमानुसार कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास त्यानं सदस्यत्व गमवावे लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.