Pune ACP Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयात येरवडा, फरासखाना, सिंहगड रोड, कोथरुड विभागात सहायक पोलीस आयुक्तांच्या नव्याने पदस्थापना

0

पुणे : – Pune ACP Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयातील 5 सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी गुरुवारी (दि.6) काढले आहेत. सहायक पोलीस आयुक्तांची येरवडा (Yerawada Division ACP), फरासखाना (Faraskhana Division ACP), सिंहगड रोड (Sinhagad Road Division ACP), कोथरुड (Kothrud Division ACP) विभागात बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या सहायक पोलीस आयुक्तांचे नावे आणि कंसात कोठून कोठे

  1. विठ्ठल दिगंबर दबडे ACP Vitthal Digambar Dabde (सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा-1 ते सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग)
  2. मच्छिंद्र रामचंद्र खाडे ACP Machchindra Ramachandra Khade (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा ते सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग)
  3. जगदिश दत्तात्रय सातव ACP Jagdish Dattatreya Satav (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा ते सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग)
  4. रंगनाथ बापू उंडे ACP Ranganath Bapu Unde (सहायक पोलीस आयुक्त, आस्थापना ते सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग)
  5. व्यंकटेश श्रीकृष्ण देशपांडे ACP Venkatesh Srikrishna Deshpande (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा ते सहायक पोलीस आयुक्त, अभियान, पुणे शहर)

याशिवाय सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन अजय सुभाष चांदखेडे (ACP Ajay Subhash Chandkhede) हे त्यांच्या पदाचा कार्यभार पाहून सहायक पोलीस आयुक्त, आस्थापना या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत पाहतील.

सहायक पोलीस आयुक्त विशेष शाखा -1 या पदाचा कार्यभार विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दगडू हाके (PI DS Hake) व सहायक पोलीस आयुक्त विशेष शाखा -2 या पदाचा कार्यभार विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील (PI Santosh Patil) हे त्यांचा पदभार पाहून पाहतील, असे आदेशात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.