Supriya Sule | “…तर आपण सर्वानी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार”; सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा

0

दौंड: Supriya Sule | बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत होत आहे. दरम्यान दौंडकरांचे आभार मानताना सुप्रिया सुळेंनी उपोषणाला बसण्याबाबत भाष्य केले आहे. राज्यात कांद्याला दर नाही, दुधाला दर नाही ,येत्या काही दिवसात दर न मिळाल्यास मी आंदोलन करणार असे म्हंटले होते. तर आपण सर्वानी उपोषणाला बसायचे आहे, मीही उपोषणाला बसणार असल्याचे यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

दुधाचे दर सात दिवसात वाढवा अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा सुळेंनी दिला मागील आठवड्यात दिला होता. “दुधाच्या दराच्या संदर्भात पशुसंवर्धन विभाग आणि खरेदीदार संघांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून गाईच्या दुधाला पंचवीस रुपये प्रति लिटरला दर होता.

मात्र, दीड महिन्यापूर्वी तो २७ रुपये करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. म्हणजे दुधाचे दर जवळपास २९ रुपयांवर पोहोचले होते. अशातच आता पुन्हा २५ मेपासून दोन रुपयांनी दर कमी केले आहेत. त्यामुळे सध्या २९ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या दुधाचे दर आता पुन्हा २७ रुपयांपर्यंत खाली आले आहे.

एका बाजूला दुधाचे दर कमी होत असताना दुसऱ्या बाजुला पशुखाद्य, चारा यांचे दर अतिशय वाढलेले दिसत आहेत. दुधाच्या कमी झालेल्या दरांमुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहेत. हे लक्षात घेता माझी शासनाला विनंती आहे की, दूधाचे दर पुर्ववत करण्याच्या दृष्टीने सात दिवसांच्या आत शासनाने पावले उचलावीत. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.” असे सुप्रिया सुळेंनी म्हंटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.