Gultekadi Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हावभाव व इशारे, आरोपी गजाआड

0

पुणे : – Gultekadi Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तसेच तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव व अश्लील इशारे (Obscene Gestures) करुन विनयभंग केला (Molestation Case). याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) एका व्यक्तीवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.5) दुपारी अडीच ते सायंकाळी सात या दरम्यान गुलटेकडी परिसरात घडला आहे.

याबाबत 16 वर्षीय पिडीत मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आनंद रामचंद्र घोंगडे Anand Ramchandra Ghongde (वय-35 रा. गुलटेकडी, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354(अ), 354(ड), पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत मुलीचा दोन ते तीन वेळा पाठलाग केला. फिर्य़ादी घरात असताना आरपीने घराच्या बाहेर येऊन अश्लील शिवीगाळ केली. तसेच बाहेर जात असताना तिच्यासोबत अश्लील बोलून, अश्लील इशारे व हातवारे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मतिमंद मुलीला मारहाण करुन असभ्य वर्तन

हडपसर : आजीकडे जात असताना 14 वर्षाच्या मतिमंद मुलीला रस्त्यात अडवून तिला मारहाण केली. तसेच तिचा हात पकडून जबरदस्तीने घरात नेऊन तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग केला. हा प्रकार गुरुवारी (दि.6) सायंकाळी सव्वा सात ते साडे सात या दरम्यान हडपसर परिसरात घडला आहे. याबाबत 40 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी जिवा उर्फ जिवन थॉमस Ziva Alias Jeevan Thomas (वय अंदाजे 35-40) याच्यावर आयपीसी 354, 354(अ), 341 सहो पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल आहे. फिर्यादी यांची 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी मतिमंद असून गुरुवारी सायंकाळी घराला कुलूप लावून आजीकडे जात होती. त्यावेळी आरोपीने तिला रस्त्यात अडवून तिच्या कानशिलात लगावली. तसेच तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने घरात नेवून पुन्हा मारहाण केली. आरोपीने त्याच्या अंगावरील कपडे काढून मुलीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.