Viman Nagar Pune Crime News | पुणे: ऑफिसमध्ये महिलेचे काढलेले अश्लील फोटो केले व्हायरल, गुन्हा दाखल
पुणे : Viman Nagar Pune Crime News | ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सहकारी महिलेचे अश्लील फोटो (Obscene Photo) काढून ते महिलेच्या मुलीच्या व मुलाच्या व्हॉट्सअॅपवर तसेच इतरांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2019 ते 23 जून 2024 या कालावधीत विमाननगर भागातील महिलेच्या ऑफिसमधील बेडरुम मध्ये घडला आहे. (Molestation Case)
याबाबत 53 वर्षीय महिलेने रविवारी (दि.23) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्वेत रंजन पाठक Shwet Ranjan Pathak (वय-45 रा. निको गार्डन, विमाननगर) याच्यावर आयपीसी 354, 354(क), 506, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी विमाननगर भागात एकाच कार्यालयात काम करतात. आरोपीने ऑफिसमधील बेडरुममध्ये फिर्यादी यांच्या नकळत त्यांचे न्यूड फोटो काढले. त्यानंतर पत्नीच्या मोबाईलवरुन ते फोटो फिर्यादी महिलेच्या मुलीच्या, मुलाच्या तसेच इतरांच्या व्हॉट्सअॅपवर पाठून महिलेची बदनामी करुन विनयभंग केला. तसेच न्यूड फोटो 2016 देशात व्हायरल करण्याची धमकी देऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मारहाण करुन महिलेचा विनयभंग
पुणे : बसलेल्या श्वानाच्या अंगावर गाडी घातल्याचा जाब विचारल्याने चार जणांनी एका महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच महिलेचे अंगावरील कपडे फाडून विनयभंग केल्याची घटाना टिंगरेनगर (Tingre Nagar Pune) परिसरात घडली आहे. हा प्रकार 21 जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडला आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बबन गायकवाड Rahul Baban Gaikwad (वय-30), बबन गायकवाड (वय-55) दोन महिला (सर्व रा. टिंगरेनगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 354, 323, 504, 34, प्राण्यांना कृरतेने वागवणे प्रतिबंध 11 नुसार गुन्हा दाखल केला आहे.