Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना अटक,5 जणांवर गुन्हा

0

पुणे : – Sahakar Nagar Pune Crime News | पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला (Morning Walk) येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत (Robbery Case) असलेल्या पाच जणांवर गुन्हा दाखल करुन दोन जणांना अटक केली आहे. सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) ही कारवाई गुरुवारी (दि.6) पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास तळजाई मंदिराकडे (Taljai Temple) जाणाऱ्या रोडवरील कै. सदु शिंदे स्टेडीअमच्या जवळ असलेल्या सेल्फी पाँईंट येथे केली.

अमर अनंत काथवटे (वय-26 रा. अण्णाभाऊ साठे नगर, अरण्येश्वर, पुणे), अभिजीत श्रावण चंदनशिवे (वय-26 रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) यांना अटक केली आहे. तर ऋषीकेश उर्फ ऋषी राजु शिंदे (वय-26 रा. अरणेश्वर, पुणे), गणेश अनंत काथवटे (वय-25 रा. अरणेश्वर, पुणे), अमित उर्फ ऋद्यनाथ बाबु ढावरे (वय-22 रा. अरणेश्वर, पुणे) यांच्यावर आयपीसी 399 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर लाला सुतकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी तळजाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सेल्फी पॉईंटच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला अंधारात काही तरुण बसले असून ते फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथक तळजाई पठार येथे गेले. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन तीन जण पळून गेले तर दोन जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता फिरायला येणाऱ्यांना लुटणार असल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.