Chandrashekhar Bawankule | सरकारमधून मुक्त करण्याच्या फडणवीसांच्या विधानावर बावनकुळे म्हणाले ‘सरकारमध्ये राहूनही…’

0

मुंबई : – Chandrashekhar Bawankule | लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात महायुतीला काही जागा कमी मिळाल्या, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो. मी स्वत: यामध्ये कमी पडलो. ती कमतरता भरुन काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं, असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी सरकारमध्ये राहून संघटनेचं काम करावं, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले बावनकुळे?

देवेंद्र फडणवीसांचा निर्णय आम्हाला मान्य नसून सरकारमध्ये राहुनही संघटनेचं काम करता येतं, अशी साद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातलीयं.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण जबाबदारी असून फडणवीस यांनी सरकारमध्ये राहुनचं संघटनेला पुढे न्यावे. त्यांनी सरकारमध्ये राहुनच सरकारला मदत करण्याची गरज आहे. ही अपेक्षा आम्हाला फडणवीसांकडून असून ते आमची अपेक्षा मान्य करतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

सरकारमध्ये असताना संघटनेचं काम करता येत नाही, अशी देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता असून ही भावना त्यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी भावना आमच्यासह वरिष्ठ नेते मान्य करणार नसल्याचं बावनकुळेंनी सांगितलं. लोकसभा निडवणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याचं आम्हाला दुखं: आहे. मात्र, फडणवीस सरकारमध्ये राहुन संघटनेला वेळ देतील त्यानंतर निवडणुकीत ज्या कमी जाणवल्या आहेत. त्यावर आम्ही काम करणार आहोत, फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्हाला यश मिळणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.