Rohit Pawar | अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार संपर्कात; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

0

सातारा: Rohit Pawar | लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election Results 2024) यशानंतर आमदार रोहीत पवार यांनी आज (बुधवारी) कऱ्हाड (जि. सातारा) येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधी स्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार आमच्या पक्ष प्रमुखांच्या संपर्कात आहेत, तर आणखी १२ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. ते आमदार काय निर्णय घेतात हे लवकरच समजेल. आमच्या संपर्कातील १९ आमदारांपैकी कोणाला घ्यायचे हे आमचे नेते ठरवतील.

मात्र, अडचणीच्या काळात जे लोक निष्ठेने आमच्याबरोबर राहिले त्यांना पहिले तर जे सत्तेत गेले आहेत त्यांना दुसरे प्राधान्य मिळेल”, असे मत आमदार रोहित पवार यांनी येथे व्यक्त केले.

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे विचार फोटो लावून मिळत नसतात. खऱ्या अर्थाने हे विचार जपण्याचे काम शरद पवार यांनी केलेले आहे. तत्व हे चव्हाण साहेबांना महत्वाचे होते तेच तत्व शरद पवार जपत आहेत.

फोटो लावून विचार मिळत नसतो. त्याला संघर्ष करावा लागतो. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे त्याच विचाराचे यश असल्याचे पवारांनी सांगितले.

यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जशराज पाटील, सौरभ पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.