Pimpri Chinchwad Cyber Crime | पिंपरी : फसवणुक करण्यासाठी दुबईतील व्यक्तीला बँक अकाऊंट देणाऱ्याला अटक, पिंपरी-चिंचवड सायबर सेलची राजस्थानमध्ये कारवाई

0

पिंपरी : – Pimpri Chinchwad Cyber Crime | फसवणूक करणासाठी दुबईमधील सायबर गुन्हेगाराला बँक अकाऊंट देणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवड सायबर सेलच्या (Pimpri Chinchwad Cyber Cell) पथकाने राजस्थानमधून अटक केली आहे. ही कारवाई फसवणुकीसाठी बनावट अकाऊंट देण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात करण्यात आली. आरोपीच्या आयसीआयसीआय बँक खात्यात तीन लाखांचे ट्रान्झाक्शन झाल्याचे समोर आले आहे. (Pimpri Chinchwad Police)

मोहम्मद जुबेर जावेद चव्हाण (वय-21 रा. ईस्लामपुर मोहल्ला, फत्तेपुर रोड, जि. सिकर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेला व्हॉट्सअॅपवर मेसेज करुन विश्वास संपादन केला. त्यानंतर गुगल रेटिंग टास्क देऊन अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेला दोन लाख 45 हजार रुपये बँक खात्यात भरण्यास भाग पाडून फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित महिलेने एन.सी.सी.आर पोर्टलवरून सायबर क्राईमला तक्रार दिली होती.

गुन्ह्याचा तांत्रिक तपास सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी व पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण करत होते. त्यांनी ज्या बँक खात्यात पैसे पाठवले होते त्या खात्याच्या स्टेटमेंटचा तांत्रिक तपास केला. त्यानंतर बँक खातेदाराचा शोध घेऊन आरोपी निष्पन्न केला. सायबर सेलच्या पथकाने तीन हजार किमीचा प्रवास तीन दिवसांत करुन आरोपीचा शोध घेतला. दाखल गुन्ह्यात आरोपीचा सहभाग असल्याने त्याला अटक करुन हिंजवडी पोलिसांच्या ताब्यत दिले.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी सायबर फसवणुकीच्या बाबत www.cybercrime.gov.in या पोर्टलवर किंवा 1930 यावर फोन करुन तक्रार करावी.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेसी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीसन निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार लोखंडे, कारके यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.