Khadki Pune Crime News | पुणे: महावितरणचा अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठाला 7 लाखांचा गंडा

0

पुणे : – Khadki Pune Crime News | पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकला फोन करुन महावितरण कंपनीचा (Mahavitaran Officer) अधिकारी असल्याचे सांगून वीज बिल भरले नसल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या मोबाईलमध्ये अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून 7 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक केली (Cheating Fraud Case). याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) सायबर चोरट्यावर (Cyber Thieves) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 18 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास ऑनलाइन घडला आहे. (Online Cheating Case)

याबाबत प्रविण सदाशिव जोशी (वय-65 रा. भाऊपाटील रोड, बोपोडी, पुणे) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गौरव जोशी नावाची व्यक्ती, मोबाईल धारक व बँक खाते धारक यांच्यावर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार (IT Act) गुन्हा दाखल केला आहे. (Online Fraud Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी मोबाईल धारकाने फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. त्याने महावितरण अधिकारी गौरव जोशी बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर विजबील बाबत विचारना करुन तुमचे विजबील भरल्याचा तपशील आमच्या सिस्टीम मध्ये दिसत नसल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोर वरुन अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. सायबर चोरट्याने फिर्यादी यांच्या विविध बँक खात्याची माहिती घेऊन त्यामधून 7 लाख 63 हजार 587 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर करुन घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रविण जोशी यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.