Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: IPO मध्ये 20 व त्यापेक्षा जास्त परतावा देण्याचे आमिष, आयटीयन्स महिलेची 26 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | शेअर्सचे ब्लॉक ट्रे़ड, आयपीओ मध्ये 20 टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष संगणक अभियंता (IT Engineer) असलेल्या महिलेला दाखवले. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करुन तिच्याकडून 26 लाख 50 हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केली (Cheating Fraud Case). हा प्रकार रहाटणी येथे 26 मे ते 11 जून या कालावधीत घडला आहे.

याबाबत रहाटणी येथे राहणाऱ्या 39 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने मंगळवारी (दि. 18) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जुही पटेल, नरेश कुमार जडेजा आणि इतर अज्ञातांच्या विरोधात आयपीसी 420, 419, 406 सह माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी अॅक्ट) कलम 66(सी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्या आयटी कंपनीत नोकरी करतात. सायबर चोरल्यांनी एमएसएफएल गुजरात (MSFL Gujarat) येथील मूळ कंपनीचे बनावट ट्रेडमार्क, संचालकांची बनावट ओळख आणि कंपनीचे बनावट वेब अॅप्लिकेशन तयार केला. त्याद्वारे महिलेला शेअर्सचे ब्लॉक ट्रेड व आयपीओ मध्ये 20 टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

गुंतवणुकीसाठी महिलेकडून वेगवेगळ्या बँक खात्यात 26 लाख 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर गुंतवलेल्या रक्कमेवर 63 लाख 90 हजार रुपये परतावा मिळाला असल्याचे दाखवले. त्यांना आणखी जास्त गुंतवणूक करा, असे सांगितले. मात्र, फिर्यादी यांनी त्यांनी गुंतवलेली मुळ रक्कम व त्यावरील परतावा मागितला. मात्र, आरोपींनी तो देण्यास नकार देत फसवणूक केली. तसेच कमिशनपोटी आणखी 12 लाख 78 हजार रुपयांची मागणी केली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.