Vishal Agarwal Arrest | पोलिसांनी विशाल अगरवालच्या घराची घेतली झाडाझडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून

0

पुणे : Vishal Agarwal Arrest | पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात अभियंता असलेल्या अनिश अवधिया (Aneesh Awadhiya) आणि अश्विनी कोस्टा (Ashwini Costa) यांचा मृत्यू झाला (Porsche Car Accident Pune). या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईला घेऊन प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी नव्याने कारवाई करत आरोपींना न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने अल्पवयीन मुलाला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले. तर मुलाचे वडील विशाल अगरवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Kalyani Nagar Accident)

पोलिसांनी गुरुवारी विशाल अगरवाल याला सोबत घेऊन त्याच्या घरी झाडाझडती घेतली. यावेळी तो वापरत असलेला मोबाईल पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलाआहे. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अल्पवयीन मुलाचे वडील त्यांच्या घरीच होते मात्र पोलिसांना त्यांनी आपण शिर्डीला असल्याचे सांगितले.

अगरवाल सोबत असलेल्या व्यक्तीची पत्रकारांना अरेरावी

पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल (Surendra Kumar Agarwal) यांना बिल्डर विशाल अगरवाल आणि चालकाला समोर बसवून काही प्रश्न विचारले तेव्हा आजोबांसोबत आलेल्या एका नातेवाईकाने आपण वकील असल्याचे सांगत पत्रकारांना उलट सुलट बोलण्यास सुरुवात केली. ” हे गरीब लोक कोण आहेत ? यांना अगरवाल कोण आहेत याची कल्पना आहे का ? मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना फोन केला की हे प्रकरण मिटेल, त्यांच्या नादी का लागत आहेत ? अशा शब्दात अरेरावी केली.

अल्पवयीन मुलाने ड्रग्स घेतल्याची चर्चा

अपघातास कारणीभूत असलेल्या अल्पवयीन तरुणाने अपघातावेळी ड्रग्स सेवन केले असल्याचे बोलले जात आहे. संबंधित मुलाच्या रक्त तपासणीचा अहवाल आलेला नसल्याने पोलिसांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी पब मध्ये मद्यसेवन करतानाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो ड्रग्स घेत असल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.