Maharashtra Assembly Elections 2024 | विधानसभेआधीच महाविकास आघाडीत कुरघोडीचे राजकारण; पुण्यात राष्ट्रवादी-शिवसेनकडून 6-6 जागांवर दावा

0

पुणे : Maharashtra Assembly Elections 2024 | लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्टींना आपली ताकद दाखवली जातेय. मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत संभ्रम आहेत. एकाच पक्षाचे अनेकजण मतदारसंघात इच्छुक असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे.

मात्र अशातच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) यांमध्ये सुप्तवाद असल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने पुण्यातील आठपैकी सहा जागांवर दावा केला आहे. त्यामध्ये शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly), हडपसर (Hadapsar Assembly), पर्वती (Parvati Assembly), वडगाव शेरी (Vadgaon Sheri Assembly), खडकवासला (Khadakwasla Assembly) आणि पुणे कॅन्टोमेंट (Pune Cantonment Assembly) या मतदारसंघांवर पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दावा केला आहे.

यांनतर लगेच शिवसेना ठाकरे गटानेही सहा जागांवर दावा केला आहे. पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड (Kothrud Assembly), कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि कसबा (Kasba Assembly) या सहा विधानसभा मतदारसंघाचा त्यामध्ये समावेश आहे. यापूर्वी शहरात शिवसेनेचे चार खासदार निवडून आले होते. सध्या शहरात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी पूर्ण झाली असून ताकदही वाढली आहे.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पुण्यात सहा जागा मिळाव्यात असे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी वरिष्ठांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच महाविकास आघाडीतील घटक पक्षात जागावाटपावरून शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.