IMD on Mumbai Monsoon | मोसमी पाऊस मुंबईत कधी धडकणार? मुंबईकर उकाड्याने हैराण, हवामान विभाग काय सांगतो!

0

मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)

मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

राज्यातील ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.