Home Loan | SBI ने दिला जोरदार धक्का… महाग झाले कर्ज, आता भरावा लागेल जास्त ईएमआई

SBI-Image

नवी दिल्ली : Home Loan | RBI ने यावेळी रेपो रेटमध्ये (Repo Rate) बदल केलेला नाही, तरीही अनेक बँकांनी कर्जावरील व्याज वाढवण्यास सुरूवात केली आहे. भारतीय स्‍टेट बँकने होम लोनच्या व्याजात पुन्हा एकदा वाढ केली आहे. याचा अर्थ असा आहे की, आता तुम्हाला कर्जावर जास्त ईएमआई भरावा लागेल. एसबीआयने आरबीआयच्या आर्थिक धोरण बैठकीनंतर काही दिवसातच व्याजात वाढ करण्याची घोषणा केली आहे. (SBI Home Loan)

भारतीय स्‍टेट बँकेने १५ जूनपासून सर्व टेन्‍योरसाठी आपल्या मार्जिनल कॉस्‍ट ऑफ लेंडिंग रेट्समध्ये १० बेसिस पॉईंट अथवा ०.१% ची वाढ केली आहे. एसबीआयच्या पावलामुळे एमसीएलआर संबंधीत सर्व प्रकारच्या कर्जाचे ईएमआय वाढणार आहे. आता तुम्हाला प्रत्येक महिन्याला कर्जावर जास्त ईएमआय भरावा लागेल.

कोणत्या टेन्‍योरवर किती झाला एमसीएलआर?
एसबीआयच्या वाढीसह एक वर्षाचा एमसीएलआर ८.६५% वरून वाढून ८.७५% झाला आहे, ओव्हरनाईट एमसीएलआर ८.००% वरून वाढून ८.१०% झाला आहे आणि एक महीना आणि तीन महीन्यांचा एमसीएलआर ८.२०% वरून वाढून ८.३०% झाला आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर आता ८.५५% वरून वाढून ८.६५% झाला आहे. याशिवाय, दोन वर्षांचा एमसीएलआर ८.७५% वरून वाढून ८.८५% झाला आहे आणि ती वर्षांचा एमसीएलआर आता ८.८५% वरून वाढून ८.९५% झाला आहे.