Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अपघात प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास, अल्पवयीन मुलासोबत पार्टीत सामील झालेल्या 15 जणांची चौकशी

0

पुणे : – Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणी नगर पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident Pune) प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून (Pune Police) सखोल तपास करण्यात येत आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसोबत पबमधील पार्टीत (Party In Pub Pune) सहभागी झालेल्या 15 मुलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पार्टीत सामील झालेल्या मुलांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा केले होते. उर्वरित 48 हजार रुपयांचे बिल अपघातातील अल्पवयीन मुलाने दिल्याचे चौकशीत समोर आले आहे.

अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने (Juvenile Justice Board – JJB) 25 जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश बुधवारी (दि.12) दिले. 19 मे रोजी कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवून संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी सखोल तपास करुन अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल (Vishal Agarwal), आई शिवानी अगरवाल (Shivani Vishal Agarwal), आजोबा सुरेंद्र अगरवाल (Surendra Kumar Agarwal) तसेच रक्ताचे नमुने बदलणारे ससून मधील डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware), डॉ. श्रीहरी हाळनोर (Dr Shrihari Halnor), शिपाई अतुल घटकांबळे (Atul Ghatkamble), पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विक्रीकरणारे पब मालक, कर्मचारी यांना अटक केली.

अपघात होण्यापूर्वी अल्पवयीन मुलागा त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी कोझी आणि ब्लॅक पबमध्ये (Cosie – Black Pub) गेला होता. अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांनी तेथे मद्यप्राशन केले. पार्टीत सामील झालेल्या 15 मुलांची पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात आल. पार्टीत सामील झालेल्या मुलांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये आणले होते. उर्वरित 48 हजार रुपये अपघात करणाऱ्या मुलाने पबमध्ये जमा केल्याची माहिती पुणे पोलिसांना (Pune Crime Branch) चौकशीत मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.