ACB Trap On Social Welfare Dept. Officer | शाळेचे अनुदान मंजूर केल्याप्रकरणी घेतले एक लाख, समाजकल्याण विभागातील क्लास वन महिला अधिकाऱ्यासह दोघे एसीबीच्या ताब्यात

0

सांगली : – ACB Trap On Social Welfare Dept. Officer | शैक्षणिक संस्थेस मंजूर अनुदानासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी करुन एक लाखाची लाच घेताना समाज कल्याणच्या अतिरिक्त सहायक संचालक (Department of Social Welfare Satara ZP) तथा सातारा जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी (क्लास वन) सपना सुखदेव घोळवे Sapna Sukhdev Gholve (वय-40 रा. सातारा) यांना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. तसेच समाज कल्याण निरीक्षक दिपक भगवान पाटील Deepak Bhagwan Patil (वय-36 रा. सांगली) याने आश्रम शाळेच्या अनुदानाच्या धनादेशासाठी दहा हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणी त्यालाही अटक केली आहे. समाज कल्याण विभागातील दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. (Sangli ACB Trap)

याबाबत 38 वर्षीय व्यक्तीने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि.5) तक्रार दिली आहे. सपना घोळवे (Dr Sapna Gholve) या सातारा जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असून सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालकाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांच्याकडे आहे. सांगली जिल्ह्यातल्या एका निवासी शाळेला अनुदान मंजूर केल्याच्या मोबदल्यात सहा लाखांची मागणी सपना घोळवे यांनी केली होती. त्यापैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना घोळवे यांना सांगलीतल्या समाज कल्याण कार्य़ालयात रंगेहाथ पकडले. (Sangli Bribe Case)

काय आहे प्रकरण?

तक्रारदार यांच्या नातेवाईकाची एक शैक्षणिक संस्था आहे. शाळेला शासनामार्फत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमातील निवासी शाळेत शिक्षण देण्यासाठी 59 लाख 40 हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानाचा पहिला हप्ता 29 लाख 70 हजार रुपये शाळेला दिला आहे. पहिला हप्ता दिल्याचा मोबदला म्हणून दहा टक्के व दुसरा 29 लाख 40 हजार रुपयांचा हप्ता देण्यासाठी दहा टक्के असे मिळून सहा लाख रुपये लाचेची मागणी घोळवे यांनी केली.

तक्रारदार यांनी याबाबत बुधवारी सांगली एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यामध्ये घोळवे यांनी सहा लाख रुपये लाच मागितली. तडजोडी अंती पाच लाख रुपये लाच मागितली. त्यापैकी एक लाख रुपये पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले. एसीबीच्या पथकाने सामाजिक न्याय भवनामधील इतर मागास बहुजन कल्याण विभागात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाच स्वीकारताना सपना घोळवे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

तर याच कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक दिपक पाटील याने तक्रारदार यांच्याकडे आश्रम शाळेच्या अनुदानाच्या कामा करीता स्वतः साठी 10 हजार रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करुन ताब्यात घेण्यात आले. दोघांविरूद्ध रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रितम चौगुले, सलीम मकानदार, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, विना जाधव, अनिस वंटमुरे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.