Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : … म्हणून मिळाला नाही नोंदणी क्रमांक, आलिशान कार मालकाकडं ‘एवढे’ रुपये नव्हते (Video)

0

पुणे : – Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणी नगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना धडक दिली. यामध्ये आयटी अभियंता असलेल्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला (Pune Kalyani Nagar Accident). या अपघातातील पोर्शे कार पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावासायिक विशाल अगरवाल (Builder Vishal Agrwal) यांची असून ही महागडी कार परराज्यातून आणली आहे. त्या कारची आरटीओ कार्य़ालयात नोंदणीच झालेली नसून, नोंदणी न होताच ती गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर चालवली जात होती. तसंच धक्कादायक बाब म्हणजे, या आलिशान कारसाठी 1758 रुपये नोंदणी फी न भरल्यानं तिला नोंदणी क्रमांकही देण्यात आला नाही, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर (Sanjeev Bhor) यांनी दिली. (Pune RTO Office)

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या म्हणण्यानुसार, अपघातातील पोर्शे कारला तात्पुरता नोंदणी क्रमांक हा प्रादेशिक कार्यालय बंगळुरु, कर्नाटक यांनी जारी केला आहे. हा क्रमांक 18 मार्च 2024 ते 17 सप्टेंबर 2024 असा 6 महिन्यांसाठी वैध होता. तात्पुरता नोंदणी क्रमांक जारी केल्यावर नोंदणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित वाहन मालकाची असून, वाहन मालकाने 18 एप्रिल रोजी वाहन तपासणीसाठी ते आरटीओ कार्यालयात पाठवलं होतं. तपासणी झाल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी त्याचं अप्रुव्हल देखील दिलं होतं. तसेच वाहनाची प्रिस्काईप फी 1758 रुपये वाहन मालकानं न भरल्यामुळे वाहन प्रणालीवर त्याचा नोंदणी क्रमांक जारी झालेला नाही. आजतागायत या वाहन मालकानं ती 1758 रुये फी भरलेली नाही. तसेच हे इलेक्ट्रिक वाहन असल्यामुळे या वाहनाला राज्या कर माफी आहे. पण वाहन मालक यांना अप्रुव्हल फी न भरल्याने त्यांना नोंदणी क्रमांक दिला नाही.

महाराष्ट्रात गाडी विकली गेली असती तर येथील डीलरकडून गाडीचे रजिस्ट्रेशन झाले असते. डिलकरडून तात्पुरते रजिस्ट्रेशन केले जात नाही. या प्रकरणात गाडी परराज्यातून आली आहे. त्यामुळे परराज्यातून गाडी येताना दुसऱ्या राज्यासाठी तिथला डीलर तात्पुरते रजिस्ट्रेशन करुन देतो. या तात्पुरत्या रजिस्ट्रेशनवर विना क्रमांक ही गाडी आपल्या राज्यात आणली जाऊ शकते, मात्र रस्त्यावर चालवायची म्हटली तर ती तात्पुरती किंवा कायम स्वरुपी रजिस्ट्रेशन असल्याशिवाय आणता येत नाही.

गाडी मालकाने मार्चमध्ये रजिस्ट्रेशनचे पैसे भरले. गाडी निरिक्षकाला दाखवली होती. मात्र, गाडीचा कर भरणे आवश्यक आहे. तो कर गाडी मालकाने भरला नाही. जोपर्यंत गाडी मालक गाडीचा कर भरत नाही तोपर्यंत त्याला आरटीओ कडून क्रमांक दिला जात नाही. बाहेरच्या राज्याने तात्पुरते रजिस्ट्रेशन करुन दिले होते. यात मुंबईच्या डीलरने गाडीचे बुकिंग घेतलेले आहे. या डीलरची गाडीचे रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी होती. पण त्याने ते केले नाही. गाडीच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलाने विनाक्रमांक नव्हे तर विना रजिस्ट्रेशन गाडी चालविली आहे, असे भोर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.