Pimpri Chinchwad Police Bandobast | पिंपरी : मतमोजणीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, पोलीस आयुक्तांकडून पाहणी

पिंपरी : – Pimpri Chinchwad Police Bandobast | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची मतमोजणी (Lok Sabha Election Counting) मंगळवारी (दि.4) होणार आहे. मावळ लोकसभा मतदार (Maval Lok Sabha) संघाची मतमोजणी श्री शिव छत्रपती क्रीडासंकुल, बालेवाडी (Balewadi) येथे होणार आहे. मतमोजणीच्या दरम्यान किंवा मतमोजणीनंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बालेवाडी मतमोजणी केंद्राला भेट देऊन या ठिकाणीच्या बंदोबस्ताची पाहणी केली.
बालेवाडी मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्त
पोलीस उपायुक्त -2, सहायक पोलीस आयुक्त -5, पोलीस निरीक्षक -13, सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक – 34, पोलीस अंमलदार-250, आरसीपी -2 एकूण 53 अधिकारी आणि 250 पोलीस अंमलदार
शहरातील बंदोबस्त
पोलीस उपायुक्त -6, सहायक पोलीस आयुक्त -10, पोलीस निरीक्षक/ सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक – 170, पोलीस अंमलदार-1750, आरसीपी -5, स्ट्रायकिंग – 4
- मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात तसेच आयुक्तालयामध्ये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
- मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॉर्डलेस फोन, टॅब, लॅपटॉप, तसेच इलेक्ट्रीक घड्याळ नेण्यास मनाई आहे.
- मतमोजणी परीसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
- मतमोजणी परीसरात ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
- निकाल जाहिर झाल्यानंतर मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आलेली आहे.