Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : तोतया पोलीस अधिकाऱ्याने खंडणीत घेतले बिअर बॉक्स

1st June 2024

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | बिअर शॉपी व्यावसायिकाला एका तरुणाने पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. तसेच त्यांच्याकडून दोन बिअरचे बॉक्स खंडणी (Extortion Case ) म्हणून घेतले. याप्रकरणी तोतया पोलीस अधिकाऱ्याला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.30) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खेड (Khed) तालुक्यातील पाईट येथील आर्या बिअर शॉप येथे घडला आहे.

याबाबत बिअर शॉपीचे मालक सचिन भाऊ वाळुंज (वय-48 रा. पाईट ता.खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश ज्ञानेश्वर चव्हाण (वय-38 रा. परंडवाल चौक, देहू मुळ रा. तळवडे) याच्यावर आयपीसी 384, 170 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ाद सचिन वाळुंज याचे पाईट येथे आर्या बिअर शॉपी नावाच बिअर शॉप आहे. फिर्यादी गुरुवारी रात्री बिअर शॉपीमध्ये असताना आरोपी गणेश चव्हाण तेथे आला. आरोपी चव्हाण याने पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगून बनाव रचून सचिन वाळुंज याला धमकावले. त्याच्या दुकानातून 4 हजार 560 रुपये किमतीच्या बिअरच्या 24 बाटल्या (दोन बॉक्स) खंडणी स्वरूपात घेतले. याबाबत सचिन वाळुंज यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर आरोपी गणेश चव्हाण याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय जाधव करीत आहेत.