Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : मोबाईल घेतल्याच्या संशयावरुन तिघांना रॉडने मारहाण, दोघांना अटक

1st June 2024

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | मोबाईल घेवून तो कोणाकडे तरी दिला असल्याचा संशय घेऊन पाच जणांच्या टोळक्याने तिघांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.29) रात्री पावणे दहाच्या सुमारास आळंदी फाटा येथे घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. (Attempt To Murder)

याबाबत बिजयकुमार राजेशमास्टर कुमार (वय-19 रा. आळंदी फाटा, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अजय अशोक चव्हाण (रा. चाकण), रोहित राठोड( रा. नाणेकरवाडी, चाकण), विनोद गोपीनाथ कुटे (वय-25 रा. बंगलावस्ती, मेदनकरवाडी), पृथ्वीराज संतोष राठोड (वय-22 रा. खराबवाडी ता. खेड) आणि जाधव (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर आयपीसी 307, 324, 323, 504, 143, 147, 149, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3),135 नुसार गुन्हा दाखल केला असून विनोद कुटे व पृथ्वीराज राठोड यांना अटक केली आहे. (Attempt To Kill)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ रामदरस कुमार याचा मेहुणा येणार होता. त्यामुळे फिर्य़ादी रामदरस कुमार आणि सुनिल कुमार हे तिघे आळंदी फाटा येथील हिरा हॉटेल जवळ वाट पाहात थांबले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. त्यांच्यातील एकाचा मोबाईल रामदरस व सुनील यांनी घेऊन तो कोणाला तरी दिला असल्याचा संशय घेऊन आरोपींनी वाद घातला. तसेच आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी अजय चव्हाण याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड रामदरस याच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर इतर आरोपींनी फिर्यादी व सुनील कुमार यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.