Pune Crime News | पुणे : रिक्षा चालकाची मुजोरी, निवृत्त पोलीसाच्या हाताचा चावा घेऊन अंगठा तोडला

0

पुणे : – Pune Crime News | पुणे शहरामध्ये बेशीस्त वाहतुकीमुळे वाहतुक कोंडी (Traffic Jam In Pune) होऊन वादावादीचे प्रसंग नेहमीच घडतात. अनेक वेळा हाणामारीचे प्रकार घडतात. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. वाहतुक कोंडीत अडकलेल्या रीक्षाचालकाने एका दुचाकीस्वाराच्या हाताचा चावा घेऊन त्याचा अंगठा तोडला. याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police Station) रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्ञानेश्वर खंडु बेंद्रे (वय-66 रा. प्रगतीनगर, भाऊ पाटील रोड, बोपोडी, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश सोमनाथ भुसावळकर (वय-60 रा. हेरम सोसायटी, काशीनाथनगर, बालाजीनगर, धनकवडी, पुणे) याच्यावर आयपीसी 325, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.17) दुपारी तीनच्या सुमारास रविवार पेठेतील राजहंस मेटल्स समोर घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर बेंद्रे हे पोलीस दलातून निवृत्त झाले आहे. ते दुचाकीवर पत्नीसह रविवार पेठेत घरगुती सामान खरेदीसाठी आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी राजहंस मेटल्स समोर पार्क केली होती. खरेदी झाल्यावर दुचाकी बाहेर काढत असताना मागुन आरोपी रिक्षाचालक त्याच्या रिक्षातून आला. त्याला पुढे जाता येत नसल्याने त्याने शिवागाळ करत ‘पुण्यात येतात आणि गाड्या आडव्या घालतात’ असे म्हटले. याचा जाब बेंद्रे विचारायला गेले असता, त्याने फिर्यादी यांचा शर्ट फाडून धक्काबुक्की केली. तसेच उजव्या हाताच्या अंगठ्याचा जोरदार चावा घेतला. यामध्ये बेंद्रे यांचा नखापासूनचा पुढचा भाग तुटून पडला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.