Pune Porsche Car Accident | पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण : शिवानी-विशाल अग्रवालसह अश्फाक मकानदारची येरवडा कारागृहात रवानगी

0

पुणे : – Pune Porsche Car Accident | पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या आई-वडीलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी (Blood Sample Tampering Case) विशाल अग्रवाल (Vishal Agarwal), शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal) आणि अश्फाक मकानदार (Ashfaq Makandar) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तिघांची पोलीस कोठडी संपुष्टात आल्यानंतर त्यांना शुक्रवारी (दि.14) अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू एम मुधोळकर (Judge U M Mudholkar) यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने अगरवाल दाम्पत्यासह मकानदार याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

आजच्या सुनावणीदरम्यान सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) म्हणाले की, अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुदे बदलण्याबाबत अगरवाल दांम्पत्य आणि मकानदार यांच्यात एक मिटींग झाली होती. ही मिटिंग कोणत्या ठिकाणी झाली तेथे कोण कोण उपस्थित होते. या मिटिंगमध्ये आरोपींनी डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) यांच्याशी संपर्क साधला होता का याबाबत तपास करायचा आहे. डॉक्टरांना दिलेल्या 4 लाख रुपयांपैकी 3 लाख रुपये जप्त केले आहेत. एक लाख रुपये जप्त करायचे आहेत. त्यासाठी आरोपी अश्फाक मकानदार याला तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. तसेच अगरवाल दाम्पत्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी मागणी केली. परंतु कोर्टाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

सरकारी वकील सुनील कुंभार (Adv Sunil Kumbhar) यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडली. तर बचाव पक्षाच्या वतीने अॅड. हबीब मुलाणी (Adv Habib Mulani) आणि अॅड. प्रसाद कुलकर्णी (Adv Prasad Kulkarni) यांनी प्रतिवाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.