Kothrud Pune Crime News | पुणे : ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीसोबत असभ्य वर्तन, मालकावर FIR

0

पुणे : – Kothrud Pune Crime News | ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीला डिपनेक व शॉर्ट ड्रेसमध्ये यायचे असे म्हणत तिच्यासोबत अश्लिल बोलून (Speaking Obscenely) करुन विनयभंग केला (Molestation Case). याप्रकरणी ट्रेनिंग सेंटरच्या मालावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 मे ते 14 मे 2024 या कालावधीत कोथरुड येथील गामाका ए आय आय टी ट्रेनिंग सेंटर येथे घडला आहे.

याबाबत 27 वर्षीय तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून महेश गंगाधर कनेरी Mahesh Gangadhar Kaneri (रा. लोट्स लक्ष्मी, विकासनगर, वाकड) याच्यावर आयपीसी 354(अ) (ड), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोथरुड पोलिसांनी आरोपीला सीआरपीसी कलम 41(1)(अ) प्रमाणे नोटीस दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे कोथरुड येथे गामाका ए आय आय टी ट्रेनिंग सेंटर आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये पिडित तरुणी नोकरी करते. मंगळवारी फिर्यादी कामावर आल्या असता आरोपीने अशा कपड्यांमध्ये का आली, आपल्या संस्थेमध्ये कामावर येताना डिपनेक व शॉर्ट ड्रेस घालून यायचे असते तुला माहित नाही का? असे म्हणत तिच्यासोबत अश्लील बोलून स्त्रि मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन करियर बाद करण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.