Hadapsar Pune Crime News | पुणे : तरुणीचा पाठलाग करुन अश्लिल शिवीगाळ, तरुणाला अटक

पुणे : – Hadapsar Pune Crime News | तरुणीचा वारंवार पाठलाग केला. तिच्या घरी जाऊन शिवीगाळ करुन तिला मारहाण करण्याची धमकी देऊन अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग केला (Molestation Case). याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार मागील दोन वर्षापासून ते 13 मे 2024 दरम्यान हडपसर परिसरात घडला आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन ओंकार विजय कामठे Omkar Vijay Kamthe (वय-26 रा. काळेपडळ, हडपसर) याच्यावर आयपीसी 354, 354(ड), 509, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीचा डिसेंबर 2022 पासून सतत पाठलाग करुन त्रास दिला. सोमवारी (दि.13) आरोपीने तरुणीचा पाठलाग करुन तिच्या घरी आला. त्याने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली. तसेच मारहाण करुन अश्लिल शिवीगाळ करत पिडीत मुलीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पिडीत मुलीने दिलेल्या तक्ररीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मिठी मारुन तरुणीसोबत असभ्य वर्तन
कोंढवा : ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणीला मिठी मारुन तिच्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार पिसोळी (Pisoli) येथील एलेक्सा स्मार्ट टेक येथे घडला आहे. याप्रकरणी पिडीत 28 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार फईम शेख याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.