IPS Officer Quaiser Khalid Suspended | घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ! खळबळजनक माहिती आली समोर, IPS अधिकाऱ्याने पत्नीच्या खात्यात लाच स्वीकारली, राज्याचे अतिरिक्त डीजीपी कैसर खालिद निलंबित

IPS Officer Quaiser Khalid Suspended

मुंबई : IPS Officer Quaiser Khalid Suspended | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसंबंधी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. १७ लोकांचा बळी गेलेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात आता पत्नीच्या बँक खात्यात लाच स्वीकरल्याच्या आरोपाखाली राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आले आहे. ४० दिवसानंतर झालेल्या या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी भावेश प्रभुदास भिंडे याला यापूर्वीच अटक केली आहे. (Ghatkopar Hoarding Collapse)

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांच्या पत्नीच्या बँक खात्यात घाटकोपर होर्डिंगच्या परवानगीसाठी संबंधित कंपनीने लाखो रुपये जमा केल्याचे तपासात उघड झाले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर खालिद यांचे निलंबन करण्यात आले. घाटकोपर होर्डिंगला पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर परवानगी दिल्याचा आरोप कैसर खालिद यांच्यावर आहे.

विशेष म्हणजे हे होर्डिंग्ज लावण्याची परवानगी देणाऱ्या बीएमसी आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांवर तपास यंत्रणांनी कोणतीही कारवाई न केल्याने लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. आता बीएमसी आणि इतर विभागांना बाजूला ठेवून गृहविभागाच्या आदेशानंतर पोलीस विभागाने खालिद यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

पोलीस महांसचालक कार्यालयाने गृहविभागाला या प्रकरणाचा सविस्तर अहवाल दिला होता. या अहवालानंतर राज्य सरकारने आदेशात जारी करत आयपीएस कैसर खालिद यांना पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

राज्य सरकारच्या यासंदर्भातील आदेशात म्हटले आहे की, खालिद यांना निलंबित कालावधीत निर्वाह भत्ता, महागाई भत्ता आणि देय इतर भत्ते अदा केले जातील. यासाठी त्यांनी इतर कोणत्याही नोकरी, व्यवसाय किंवा व्यवसायात गुंतलेले नसल्याचे प्रमाणपत्र सादर केले पाहिजे.

इगो प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी संचालिका जान्हवी मराठेने रेल्वे पोलिसांना ४०० टक्के अधिक नफ्याचे आमिष दाखवत घाटकोपर होर्डिंगचे कंत्राट मिळविल्याचे तपासात आढळून आले.