Ajit Pawar | महायुतीच्या व्यासपीठावर पुन्हा अजित पवार प्रकटले…आणि नाराजीच्या चर्चेला मिळाला पूर्णविराम!

0

मुंबई : Ajit Pawar | आज मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या (Mumbai Lok Sabha 2024) अखेरच्या टप्प्यातील महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सांगता सभा मुंबईत होत आहेत. मनसेने (MNS Sabha) आयोजित केलेली सभा देखील आज पार पडत असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आहेत (PM Modi Sabha In Mumbai). या सभेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांचे आगमन झाल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. अजित पवार यांनी ११ मे रोजी एक पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर ते गायब झाले होते. कोणत्याही प्रचारात किंवा सभांना ते उपस्थित राहात नव्हते. तसेच ते नॉट रिचेबल झाल्याने अजितदादा नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, आज मुंबईत होत असलेल्या महायुतीच्या सभेला अजित पवार हजर झाल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, बारामती लोकसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी अप्रत्यक्षरित्या बारामतीमध्ये शरद पवारांविरोधात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आल्याची कबूली दिली होती. त्यानंतर अजित पवार अंतर दूर झाल्याचे दिसत होते. आज ते पुन्हा महायुतीच्या व्यासपीठावर आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.