Pune Mumbai Expressway | पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर शनिवार, रविवार वेळ पाहूनच प्रवास करा

0

पुणे : Pune Mumbai Expressway | यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी. क्र. २७/०० व कि.मी. क्र. ५५/०० येथे १८ व १९ मे २०२४ रोजी गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी व दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार असून पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

पुणे वाहिनीवर १८ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने शेडूंग, खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत. तसेच १९ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करुन द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने कुसगाव पथकर स्थानकावरुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

या अनुषंगाने वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करावे, या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.