Sharad Pawar NCP | शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडेंविरोधात ‘हा’ तगडा उमेदवार लढणार

0

मुंबई : Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज आणखी दोन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याबाबत माहिती देणारे शरद पवार यांच्या सहीचे पत्रक राष्ट्रवादीने एक्सवर पोस्ट केले आहे. बीड लोकसभा मतदारसंघ (Beed Lok Sabha) आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या (Bhiwandi Lok Sabha) उमेदवारांची नावे या यादीत आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांना उमेदवारी दिली आहे. तर भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Alias Balya Mama Mhatre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र ही जागा राष्ट्रवादीने पदरात पाडून घेतली आहे. आता या मतदार संघात शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे विरूद्ध भाजपाचे कपिल पाटील यांच्यात सामना होईल. तर बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे लढणार आहेत.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जाहीर केलेले उमेदवार

वर्धा – अमर काळे
दिंडोरी – भास्करराव भगरे
बारामती – सुप्रिया सुळे
शिरूर – अमोल कोल्हे
अहमदनगर – निलेश लंके

Leave A Reply

Your email address will not be published.