Pune Lok Sabha Election 2024 | पुण्यात उमेदवार मुरलीधर मोहोळ घरोघरी पोहोचणार, भाजपाची ‘विशेष प्रचार मोहिम’

0

पुणे : Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेसाठी भाजपाचे (BJP) मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) , काँग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi (VBA) वसंत मोरे (Vasant More), असे तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ही निवडणूक कोणत्याच उमेदवारासाठी सोपी असणार नाही, तर सर्वच पक्षांचा कस लागणार आहे. यासाठीच भाजपाने आपले उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी ६ एप्रिलला विशेष प्रचार मोहिम राबविण्याचे ठरवले आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी ही माहिती दिली.

६ एप्रिलला भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात भाजपा घर चलो अभियान राबवणार आहे. या दिवशी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराचे पत्रक पुणे शहरातील ३ लाख घरांमध्ये वाटले जाणार आहे. विशेष म्हणजे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) देखील या अभियानात सहभागी होणार आहेत.

या मोहिमेंतर्गत पुण्यातील महायुतीचे सर्व स्थानिक आमदार सुद्धा घरोघरी जाऊन पत्रकं वाटतील. या माध्यमातून भाजप १० ते १२ लाख नागिरकांना पत्रक देणार आहे.

भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, वर्षानुवर्ष पुणेकर भाजपला मतदान करतात. आमच्याकडे अजितदादांसारखे तगडे नेतृत्व आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम चांगले आहे. आरपीआयची ताकद आमच्यासोबत आहे, त्यामुळे हे सगळे एकत्रित मिळून मुरलीधर मोहोळ यांना खासदार करतील. मुरलीधर मोहोळ यांना मोठे मताधिक्य राहील.

धीरज घाटे म्हणाले, २०, २१ एप्रिल नंतर पुणे लोकसभेचा फॉर्म भरला जाईल. महायुतीचे सर्व नेते मोहोळ यांचा फॉर्म भरायला उपस्थित राहणार आहेत. पुण्यात केवळ मोदीजींचाच पॅटर्न चालेल. देशातल्या जनतेला मोदीजींमध्ये आश्वासक चेहरा दिसतो. म्हणून मोदी पुन्हा निवडून येतील आणि पंतप्रधान होतील, असे घाटे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.