Baramati Lok Sabha Election 2024 | बारामतीत शिव’तारे’ जमीन पर आणल्यानंतर आता हर्षवर्धन पाटलांकडे फडणवीसांचा मोर्चा, इंदापुरात ‘मनोमिनल’ सभा

0

बारामती : Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरूद्ध सुप्रिया सुळे (Supriya Sule) असा सामना आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde Shivsena) नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांविरूद्ध (Ajit Pawar) दंड थोपटले होते, त्यांनी उघडपणे बंडाची भाषा केली होती. परंतु, त्यांचे बंड थंड करण्यात आले. शिवतारे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करत आहेत. आता इंदापुरचे (Indapur) भाजपा नेते (BJP Leader) हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरसावल्याचे दिसत आहे. यासाठी उद्या इंदापुरातच (BJP Sabha In Indapur) सभा घेण्यात येत आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवारांसमोर मोठ्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. सर्वांत मोठी अडचण म्हणजे संपूर्ण पवार कुटुंब अजित पवारांच्या विरूद्ध आणि सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचारात उतरले आहे. तर आणखी एक मोठे संकट म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. यामुळे पुढील संकट ओळखून महायुतीचे नेते सावध झाले आहेत.

परंतु, याबाबतीत महायुतीचे नेते काही करू शकत नसले तरी इतर अडथळे सोडवण्यासाठी अजित पवारांच्या मदतीला महायुतीचे नेते धावुन आले आहेत. यातूनच विजय शिवतारेंचे बंड थंड करण्यात यश आले आहे.

आता भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मिशन बारामती सुरू करत हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत असलेली नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या इंदापुरात येत आहेत.

हर्षवर्धन पाटील व अजित पवार यांच्यात पॅचअप करून येथे महायुतीचा पाया भक्कम करण्याच्या प्रयत्नात फडणवीस आहेत. फडणवीस उद्या इंदापुरात महायुतीसाठी सभा घेत आहेत.

इंदापुरात माजी मंत्री व आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. भरणे यांनाच बळ देत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. परिणामी हर्षवर्धन प्रचंड नाराज आहेत. तरीही आता महायुतीसाठी हे दोन्ही नेते सभेनिमित्त एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.