Dilip Walse Patil मंत्री दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरून पडले, हात फ्रॅक्चर, पाय आणि पाठीलाही दुखापत

0

पुणे : Dilip Walse Patil | मंत्री दिलीप वळसे पाटील हे घरात पाय घसरुन पडल्याने त्यांच्या पाय आणि पाठीला दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्या खुब्याला देखील मार लागला आहे.

मोठी दुखापत झाली असल्याने त्यांना पुण्यातील औंध येथील एका खासगी रुग्णालयात करण्यात आले आहे. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.

रात्री अंधारात लाईट सुरू करायला जात असताना ते पाय घसरुन पडल्याची सांगण्यात आले. पुढील बारा ते पंधरा दिवस त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील, असे सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असताना महत्वाचे समजले जाणारे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना अशा प्रकारे दुखापत झाल्याने यामुळे पक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कारण या निवडणुकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. शिवाजी आढळराव पाटलांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.