Sanjay Raut On Mahayuti | महायुतीच्या नेत्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल, गुलाम, मांडलिक, आश्रितांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, वंचितबाबत म्हणाले…

0

मुंबई : Sanjay Raut On Mahayuti | जे गुलाम, मांडलिक आणि आश्रित असतात त्यांना मागण्याचा अधिकार आणि हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर कायम तुकडे फेकले जातात. आमचे जागावाटप आम्ही महाराष्ट्रात करतो. कधी मातोश्री, सिल्वर ओक किंवा अन्य ठिकाणी बसतो. आम्हाला उठसूट दिल्लीत जाऊन नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून बसावे लागत नाही, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, भाजपा लोकांना गळाला लावतात, त्यानंतर ती माणसे गाळात जातात. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) जिंकून येतील याविषयी आमच्या मनात शंका नाही. आम्ही सगळे पक्ष तिथे कामाला लागलो आहोत.

मी बारामतीत (Baramati Lok Sabha) सभा घेतल्या आहेत. वेळ पडल्यास उद्धव ठाकरेही तिकडे सभा घेतील. मी इतकंच सांगतो बारामतीत कुणीही येऊ द्या सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्याने जिंकून येतील. त्यामुळे माणसे गळाला लावून गाळात घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे राऊत म्हणाले.

वंचितला सोबत घेण्याबात संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची निरंतर चर्चा सुरु आहेत. आंबेडकर महाविकास आघाडीसह रहावेत अशी आमचीही इच्छा आहे आणि त्यांचीही इच्छा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.