Warje Malwadi Pune Crime News | पुणे : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला डिझेल टाकून पेटविले, पतीवर खुनाचा गुन्हा दाखल

0

पुणे : – Warje Malwadi Pune Crime News | पुणे शहरात वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत खूनाची घटना घडली आहे (Murder In Pune). वारजे परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या अंगावर डीझेल टाकून पेटवून दिले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.29) दुपारी पावणे एकच्या सुमारास गणपती माथा (Ganpati Matha Warje Malwadi) येथे घडला आहे.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहिरे गाव, गणपती माथा येथे पतीने पत्नीला पेटवून देत तिचा खून केला. पूजा प्रविण चव्हाण (वय-26 रा. न्यु अहिरे गाव, गणपती माथा) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती प्रवीण बाबासाहेब चव्हाण (वय-26) याच्यावर आयपीसी 302, 498अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पूजा यांचा भाऊ अमोल भाऊराव पवार (वय-26 रा. न्यु अहिरे गाव, गणपती माथा, शिवणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा आरोपी प्रवीण याच्याशी 2019 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपीने पूजाला त्रास देण्यास सुरुवात केली. प्रवीण पुजाला घरगुती कारणावरुन मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. बुधवारी (दि.29) दुपारी पावणे एकच्या सुमारास आरोपी प्रविण याने पत्नी पूजाला मारहाण केली. त्यानंतर तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवून दिले. यामध्ये पूजा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला. आरोपी प्रवीण याच्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे (Sr PI Manoj Shedge) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.