Pune Lok Sabha | पुणे लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट? धंगेकर-मोहोळ यांच्या समोर वसंत मोरे ठरू शकतात मोठे आव्हान, कारण…

0

पुणे : Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी भाजपाने (BJP) माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) तर काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवारीची आशा होती, पण धंगेकरांमुळे ती मावळली. आता वसंत मोरे (Vasant More) यांच्या ज्या हालचाली दिसत आहेत, त्यावरून असे जाणवते की मोरे हे धंगेकर-मोहोळ यांच्या समोर मोठे आव्हान उभे करू शकतात. कारण वसंत मोरे यांनी आता मराठा समाजाला (Marathi Community) साद घातल्याचे दिसत आहे.

वसंत मोरे यांची मराठा आरक्षण (Maratha Reservation Andolan) आंदोलनाचे उमेदवार म्हणून निवड होऊ शकते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष मराठा उमेदवार उभा करण्यासाठी मराठा समाजाची बैठक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पुण्यात देखील बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीला वसंत मोरे उपस्थित होते.

वसंत मोरे यांनी सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीत, पुण्यात खासदार होण्यासाठी सकल मराठा समाज आणि वंचितने (Bahujan Vanchit Aghadi) सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे समजते. येत्या काही दिवसांत वसंत मोरे हे मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याचे समजते.

त्यामुळे आता मराठा समाजाकडून वसंत मोरे यांना अपक्ष म्हणून उमेदवारी मिळाली तर पुणे लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट येऊ शकतो. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.

जर सकल मराठा समाजाने वसंत मोरे यांना आपला अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दिली तर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने मराठा म्हणून दिलेले उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची डोकेदुखी वाढणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.