Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष ‘वंचित’साठी दोन-दोन जागा सोडणार?

मुंबई : Mahavikas Aghadi | प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) एकतर्फी युती तोडली, चर्चाही केली नाही’, या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार नाही असे वाटत होते. परंतु वंचितने महाविकास आघाडीला शेवटचा प्रस्ताव दिला असून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष दोन-दोन जागा सोडायला तयार झाले आहेत. वंचितनेही ६ जागांचा प्रस्ताव दिल्याची खात्रीशीर माहिती आहे. (Lok Sabha Election 2024)
वंचितला दोन जागा सोडण्याबाबत अजूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून कोणत्याही सकारात्मक हालचाली सुरू नसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, काँग्रेस नव्हत्या. वंचितने महाविकास आघाडीला शेवटचा प्रस्ताव दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ६ जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सकारात्मक आहेत. या जागांवर आज महाविकास आघाडीतील नेते चर्चा करणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाकडून वंचितसाठी दोन जागा सोडल्या जाऊ शकतात. वंचितसाठी काँग्रेस सकारात्मक असून काँग्रेसला येणाऱ्या दोन जागा सोडण्यासही काँग्रेसचे नेते तयार आहे. यामुळे आता वंचित महाविकास आघाडीसोबत एकत्र येण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणा आंबेडकर यांनी केल्यानंतर वंचित महाविकास आघाडीत जाणार नाही असे वाटत असतानाच या घडामोडी झाल्या.