Harshvardhan Patil-Ajit Pawar | हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटातील वादावर फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले ”मी त्यांना…”

0

अकोला : Harshvardhan Patil-Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha 2024) महायुतीमधील (Mahayuti) अजित पवार गट (Ajit Pawar NCP) आणि भाजपा (BJP) नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच कारणावरून हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून दाद मागितली होती. अजित पवार गटाकडून धमकावण्यात येत असल्याचे त्यांनी पत्रामध्ये म्हटले होते. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीबाबत आज फडणवीस यांनी माहिती दिली. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.(Harshvardhan Patil-Ajit Pawar)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हर्षवर्धन पाटील हे जेव्हापासून भाजपमध्ये आले आहेत, तेव्हापासून ते अत्यंत समर्पित वृत्तीने
काम करत आहेत. त्यांनी कायमच भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या नेत्यांचे नेतृत्त्व मोठे झाले पाहिजे, ही पक्ष म्हणून भाजपची जबाबदारी आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांची काहीच नाराजी नव्हती. पण त्यांचे काही प्रश्न आहेत.
इतकी वर्षे एकमेकांविरुद्ध लढल्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. हे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मी हर्षवर्धन पाटील
यांना दिले आहेत. किंबहुना काही प्रश्न सोडवले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.