Pune Lok Sabha – Muralidhar Mohol | माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार; जाणून घ्या महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवारांची नावे

0

नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे, रावसाहेब दानवे, पियुष गोयल, डॉ. भारती पवार यांच्यासह 20 जणांना उमेदवारी जाहीर

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Lok Sabha – Muralidhar Mohol | भाजपच्या पुणे (Pune BJP) लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची उत्सुकता अखेर आज संपली. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे पुणे मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली असून लवकरच महाविकास आघाडीकडूनही (Mahavikas Aghadi) कॉंग्रेसच्या (Congress) उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Pune Lok Sabha – Muralidhar Mohol)

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस असलेले मुरलीधर मोहोळ यांनी तीन वेळा नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे. या कालावधीत स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौरपदासोबत शहर आणि प्रदेश भाजप व भाजयुमोमध्ये विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. कोरोना काळात महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे पुणेकरांसोबतच राज्य आणि केंद्रातील नेत्यांनीही कौतुक केले आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या मागीलवर्षी झालेल्या अकस्मिक निधनानंतर पुणे लोकसभा मतदार संघामध्ये पोटनिवडणूक झाली नव्हती. बापट यांच्यानंतर भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून मागील वर्षभर चर्चा रंगली होती. विशेष असे की निवडणुकीच्या तोंडावर मोहोळ यांच्यासोबतच माजी आमदार जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, सुनील देवधर, फ्रेंडस् ऑफ बीजेपीचे शिवाजी मानकर यांच्याही नावाची चर्चा होती. तर मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नावे देखिल चर्चेत येत होती. मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांचे नाव मागे पडले. तर मागील आठवड्यात खुद्द फडणवीस यांनी पुण्यातच एका कार्यक्रमात ते पुण्यातून निवडणूक लढणार नाहीत, असे जाहीर केले होते.

परंतू मोहोळ, मुळीक आणि देवधर यांच्यामध्ये प्रामुख्याने उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळत होती. महापौरपद कोथरूडला, मंत्रीपद कोथरूडला, राज्यसभा कोथरूडला देण्यात आली असून लोकसभेची उमेदवारी अन्य मतदार संघात द्यावी, अशी मागणी भाजपच्या एका मोठ्या गटाकडून सातत्याने करण्यात येत होती. एवढेच नाही तर या आशयाचे निनावी फलक लावून मोहोळ यांच्या उमेदवारीला विरोधही करण्यात आला होता. पक्षाच्या निरीक्षकांनी मध्यंतरी पदाधिकार्‍यांची मते जाणून घेउन अहवाल वरिष्ठांकडे पाठविला होता. त्यावेळीही इच्छुकांकडून आपल्या नावाला प्रेफरन्स देण्यासाठी लॉबिंग केल्याची जोरदार चर्चा होती. परंतू पक्षश्रेष्ठींनी अखेर मोहोळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत स्पर्धेला विराम दिल्याचे बोलले जात आहे.

मोहोळ हे मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करत असून महापौर पदाच्या कार्यकाळात त्यांचा विविध संघटना आणि संस्थांशी निकटचा संबध आला आहे. त्यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरणार आहे. परंतू बदललेल्या राजकिय परिस्थितीमध्ये तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून बदललेल्या सामाजिक बांधणीनुसार कॉंग्रेसकडून मराठेतर उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपची यादी जाहीर, महाराष्ट्रातून लोकसभेसाठी हे 20 उमेदवारी रिंगणात

१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड-पंकज मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- डॉ. भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार ! ‘पुनीत बालन ग्रुप’ करणार खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत

Merged Villages In PMC | समाविष्ट 34 गावांच्या सोयी सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार, अखेर समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय

PMC Property Tax | समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकी आणि शास्तीकर वसुलीला स्थगिती; लोकसभेच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यकर्ते झोपेतून जागे झाले?

Pune Kothrud Crime | किरकोळ कारणावरून तरुणावर सत्तुरने वार, कोथरुड परिसरातील घटना

Pune Metro | वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

Leave A Reply

Your email address will not be published.