Pune Crime News | प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा चालकाला बंडगार्डन पोलिसांकडून अटक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला मारहाण करून लुटणाऱ्या (Robbery In Pune) रिक्षा चालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे (Bund Garden Police Station) . हा प्रकार गुरुवारी (दि.7) रात्री पावणे बाराच्या सुमारास पुणे स्टेशन समोरील सम्राट गल्ली मध्ये घडला. चांद पाशा फरीदसाब (वय-46) रा. गोंधळे नगर, गल्ली नं. 10, हडपसर) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. (Rickshaw Driver Arrest In Robbery Case)

याबाबत प्रशांत संपत पवार (वय-19 रा. बालाजी नगर, कात्रज, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकावर आयपीसी 392, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत पवार हे आरोपीच्या रिक्षातून (एमएच 12 व्हियु 9885) केसनंद फाटा
येथुन कात्रज येथे जात होते. रिक्षात ते एकटे असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने पुणे स्टेशन समोरील सम्राट
गल्लीमध्ये रिक्षा बाजूला उभी केली. आरोपीने फिर्यादी यांना मारहाण करुन त्यांच्या पॅन्टच्या खिशातून रोख रक्कम
व 90 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेला.
याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune PMC – Warje Multispeciality Hospital | पुणे महापालिकेला ठेकेदार कंपनीच्या 360 कोटी रुपयांच्या कर्जाला दावणीला बांधणार्‍या वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे भूमिपूजन ऐन ‘लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या’ तोंडावर; ठेकेदार आणि राज्य सरकारचे साटेलोटे !

Leave A Reply

Your email address will not be published.