Sunil Kedar In Pune | पुण्याचे दिवंगत खासदार गिरीष बापट यांचे कार्यालय‌ कुणी फोडले होते? माजी मंत्री सुनिल केदार यांचा सवाल

0

पुणे : Sunil Kedar In Pune | पुण्याचे दिवंगत खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांचे कार्यालय आणि भाजपचे पक्ष कार्यालय जून २००७ मध्ये कुणी फोडले होते ? आसा सवाल उपस्थित करत माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी भाजप महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर टीका केली. पुण्याचा खासदार हा बापट‌ यांचा वारसदार म्हणून दिल्लीत जाणार आहे. त्यामुळे तो सुसंस्कृत व पुणेकरांचे हित‌ जपणारा हवा, असेही केदार म्हणाले. पुण्याच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी काल झालेल्या पावसात पुण्यातील रस्ते जलमय का झाले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही केदार यांनी दिले.

पुणे लोकसभा मतदार संघाचे (Pune Lok Sabha) काँग्रेस महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Congress) व इंडिया फ्रंटचे (India Aghadi) उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत‌ केदार बोलत होते. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, जेष्ठ पत्रकार सुनिल माने उपस्थित होते.

सुनिल केदार म्हणाले, पुण्यात काल जो पाऊस झाला, तेव्हा शहरातील रस्ते जलमय झालेले पाहिले. त्यावेळी वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पाहणारे आणि पुण्याच्या विकासाच्या गप्पा मारणारे आठवले. त्यांनी केलेला विकास कुठे शोधू असा प्रश्न पडला. पुण्याच्या नदीची वाट लावली आहे. जून २००७ साली बापट व भाजप पक्षाचे कार्यालय कुणी फोडले ? भापट यांनी काय चुक केली होती का ? त्यावेळी कोणाचे कोणाचे फोटो खाली पडले होते ? त्यामुळे पुण्यातील महायुतीच्या उमेदवाराला भाजपच्या‌ नावावर मते मागण्याचा अधिकार आहे का ? याचा विचार होणे गरजेचे आहे. खा. बापट शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेवून जात होते. पुणे शहर अभ्यासू व विचारवंतांचे आहे. या शहराला टिळक फुलेंचा वारसा आहे. त्यामुळे पुणेकरांनी निवडलेला खासदार कोण आहे ? हे दिल्लीत पाहिले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांनी योग्य उमेदवार निवडून पाठवणे गरजेचे आहे.

सुनिल माने म्हणाले, भाजपचा प्रवास उलट्या‌ दिशेने सुरू आहे. एससी एसटी साठी अर्थसंकल्पात करावयाची तरतूद मोदींनी दहा वर्षात केली नाही. बापट यांचे प्रचारप्रमुख असतानाही मुरलीधर मोहळ सिंगापूरला निघून गेले. शहराध्यक्षही प्रचारात सक्रीय नव्हते. वाहतुक कोंडीमुळे मोहोळांना परवा स्वत:च्याच प्रचाराला पोहचता आलं नाही. वाहतुकीच्या‌ सुधारणेसाठी मोहोळांकडे व्हिजन नाही. समाविष्ट गावांना पाणी नाही, पायाभुत सुविधा नाहीत. ज्यांना भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला त्यालाच उमेदवारी दिली, हे भाजप कार्यकर्त्यांना दुख आहे. बापट यांना आपल्या भाषणात कधीही पुण्याश्वरचा मुद्दा आणला नाही. मात्र, नितेश राणे या जहाल हिंदुत्ववादी माणसाला पुण्यात आणून त्यांची महापालिकेसमोर सभा करणे व त्याचे संयोजन मोहोळ यांनी केले, यामुळे पुण्याचे भले होणार नाही. याचे दु:ख बापट यांना होते.

उल्हास पवार म्हणाले, भाजपचे दोन दिग्गज नेते नागपूरात असताना विधान परिषद, जिल्हा परिषद केदार यांनी काँग्रेसच्या‌ ताब्यात आणली.

तुम्ही नागपूरला या नाही तर मी बारामतीत येतो.

हा कसा निवडून येतो, तो कसा निवडून येतो, असे म्हणून आणि कॉलर पकडून मत मिळत नाहीत. कोण कसा निवडून येतो, हे बघायचं असेल तर त्यांनी नागपूरला यावं नाही तर मी बारामतीला येतो, असे आव्हान सुनील केदार यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.