Indrani Balan Foundation | भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान (Video)

0

हृदयविकाराच्या गंभीर शस्त्रक्रियेसाठी मिळाली मदत

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Indrani Balan Foundation | भारतीय सैन्य दल (Indian Army) आणि पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यातील (Kashmir Valley) बारामुल्ला येथील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला (Dagger Parivaar School Baramulla) जीवनदान मिळाले. या दोन्हींच्या मदतीमुळे नऊ वर्षीय बालकावर दिल्लीत हृदयविकाराची गंभीर आणि गुंतागुतीची शस्त्रकिया यशस्वीरित्या पार पडली.

दि. 31 ऑगस्ट 2015 रोजी जन्मलेल्या मास्टर बुरहानला हृदयविकाराची गंभीर आजार असल्याचे निदान झाले. मात्र., त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे आवश्यक वैद्यकीय उपचार घेणे अवघड होत होते. ही बाब समजल्यानंतर भारतीय लष्कराच्या डॅगर डिव्हिजन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. डॅगर डिव्हिजनच्या सहाय्याने, बुरहानची बारामुल्ला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हृदयरोगतज्ञ डॉ. तारिक रशीद यांनी प्राथमिक तपासणी केली. त्यात रशीद यांनी बुरहानची हृदय शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुतीची असल्याने त्यासाठीची आवाश्यक वैद्यकीय सुविधा ह्या केवळ दिल्लीत उपलब्ध असल्याचे लक्षात आले. भारतीय लष्कर आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांनी दिल्लीतील तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांनतर बुरहानला उपचारासाठी दिल्ली कँटमधील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याठिकाणी बुरहानवर अवघड अशी हृदयशस्त्र क्रिया यशस्वीरित्या पार पडली.

मास्टर बुरहानवरील यशस्वी शस्त्रक्रियेने भारतीय लष्कराच्या मानवतावादी दृष्टीकोनाचे दर्शन घडले. याशिवाय गरजू व्यक्तींसाठी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविण्याची अतुलनीय वचनबद्धताही यानिमिताने अधोरेखित झाली.

काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील भारतीय सैन्य दल आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने विशेष मुलांसाठी डॅगर परिवार स्कूल चालविले जाते. फाऊंडेशनच्या माध्यमातून या स्कुलमधील विद्यार्थ्यावर वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळाली आणि त्याला जीवनदान मिळाले, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना अशाच सेवा- सुविधा देण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.

पुनीत बालन, अध्यक्ष इंद्राणी बालन फाउंडेशन.
(Punit Balan, President Indrani Balan Foundation)

Pune Metro | पुणे मेट्रो रेल्वे प्रशासनास मराठीचे वावडे, मराठी तिकिटे छापण्यास नकार

Pune Mahavitaran News | महावितरणला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यास तांत्रिक कर्मचारी सक्षम – प्रादेशिक संचालक अंकुश नाळे

Leave A Reply

Your email address will not be published.