Pune Police MCOCA Action | हत्याराचा धाक दाखवून लुटणार्‍यांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कठोर कारवाई ! अमन दिवेकर टोळीवर ‘मोक्का’

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून लुटणाऱ्या हडपसर परिसरातील अमन दिवेकर व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी ही कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

तक्रारदार हे दुचाकीवरुन जात असताना हडपसर (Hadapsar Police Station) येथील ख्वाजा गरीब नवाज मश्जिद जवळ तीन अनोळखी तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली. दुचाकी बंद करुन धारदार शस्त्र त्यांच्या गळ्याला लावून पॅन्टच्या खिशातून जबरदस्तीने चार हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार 6 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आयपीसी 392, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्यचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळी प्रमुख अमन संजय दिवेकर (वय-24 रा. जैननगर, बिबवेवाडी, पुणे मुळ रा. दौंड), विशाल संजय लोखंडे (वय-24 रा. अप्पर इंदिरानगर, पुणे मुळ रा. उस्मानाबाद) यांना सापळा लावुन अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार असून अमन दिवेकर याने संघटीत गुन्हेगारी तयार करुन बिबवेवाडी, काळेपडळ, म्हाडा कॉलनी हडपसर, सय्यादनगर या परिसरात दहशत माजवली आहे. या टोळीने घातक शस्त्र बाळगुन जबर दुखापत करणे, विनयभंग, गाड्यांची तोडफोड करुन दहशत पसरवणे असे गंभीर गुन्हे केले आहेत.

हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी परिमंडळ- 5 पोलीस उपायुक्त
आर राजा यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
परिमंडळ- 5 पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले,
सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप, सहायक पोलीस निरीक्षक दोरकर, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार
प्रवीण शिंदे, महेश उबाळे, वसीम सय्यद, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे, रामेश्वर नवले यांच्या पथकाने केली.

Pune Kondhwa Crime | जेवणाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन बलात्कार, कोंढवा परिसरातील धक्कादायक घटना
Pune Kondhwa Crime | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, ऐनवेळी लग्नास नकार; कोंढवा परिसरातील प्रकार, आरोपीला अटक

Leave A Reply

Your email address will not be published.