Pune Police MPDA Action | पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे स्थानबद्ध कारवाईचे शतक, आयुक्तांची एका वर्षात ऐतिहासिक कामगिरी

हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MPDA Action | पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोक्का, तडीपार, एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्तांनी दहशत पसरवणाऱ्या 100 सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची (Pune Police MPDA Action) कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत अशा प्रकारची प्रभावी कारवाई झाली आहे.

हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. राजू हनुमंत गायकवाड (वय-39 रा. कॅनॉल शेजारी, गंगानगर, हडपसर) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 100 सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धेची कारवाई केली आहे.

आरोपीवर राजु गायकवाड याच्यावर मागील चार वर्षात 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी राजु गायकवाड याला एमपीडीए कायद्यांतर्गत कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह (Kolhapur Central Jail), कोल्हापूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके व गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, वाचक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पी.सी.बी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू बहिरट, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेखर कोळी, वाचक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप झानपुरे, पोलीस अंमलदार योगीराज घाटगे, अविनाश सावंत, संतोष कुचेकर, सागर बाबरे, अनिल भोंग यांच्या पथकाने केली.

आयुक्तांची 100 वी कारवाई

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. त्यांनी शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व समाजात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चटन करण्यावर भर देण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत.

पोलीस आयुक्तांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रीय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए कायद्यान्वये स्थानबद्धतेच्या एक वर्षाच्या कालावधीत 100 कारवाया केल्या आहेत.
यामध्ये 100 आरोपींना महाराष्ट्रातील विविध कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.