Pune Viman Nagar Crime | अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरच्या विराज रविकांत पाटील याच्यावर पुण्यात गुन्हा; पिस्तूल डोक्याला लावून धमकावले

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Viman Nagar Crime | राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका युवकाने अभिनेत्री तरुणीवर बलात्कार (Pune Rape Case) करुन तिच्या डोक्याला पिस्टल लावून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) विराज रविकांत पाटील Viraj Ravikant Patil (वय-35 रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्यावर बलात्काराचा आणि आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित अभिनेत्री असलेल्या तरुणीने शुक्रवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. (Pune Viman Nagar Crime)

याबाबत टिंगरेनगर परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. यावरुन विराज रविकांत पाटील याच्यावर आयपीसी 376, 376(2)(एन), 377, 323, 504, 506, सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत विमाननगर व मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विराज पाटील याची राजकीय पार्श्वभूमी आहे. तर पीडित तरुणी अभिनेत्री आहे. आरोपी आणि फिर्य़ादी यांची ओळख फेसबुकवर झाली. आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने पीडित तरुणीला टाळू लागला. त्यामुळे फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली.

घरच्यांना का भेटवत नाही अशी विचारणा केली असता विराज पाटील याने तिला शिवीगाळ केली. तसेच त्याच्याकडे असलेले पिस्टल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तु जर पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो मी कोण आह ते, अशी धमकी देऊन धक्काबुक्की केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.