Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन तरुणीचा लैंगिक छळ, तरुणाला अटक; हडपसर परिसरातील प्रकार

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करुन तिला फिरायला नेवून तिचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केला. याप्रकरणी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते आजपर्यंत शिंदे वस्ती आणि स्वारगेट येथील केपी मॉल येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत मगरपट्टा परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) रविवारी (दि.21) फिर्याद दिली आहे. यावरुन ओमकार अखिलेश निसार (वय-18 रा. हडपसर) याच्यावर आयपीसी 354(अ)(ड), 504, 506, पोक्सो अॅक्ट 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहतात. आरोपीने पीडित तरुणी कॉलेजला जात येत असताना तिच्यासोबत मैत्री केली. यानंतर त्याने ‘तु मला आवडते, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे’ असे म्हणून तिला स्वारगटे येथील केपी मॉल येथे फिरायला नेले. त्याठिकाणी आरोपीने मुलीचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर आरोपीने फिर्य़ादी यांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवळे करीत आहेत.
- Pune Mundhwa Police | कौटुंबिक वादातून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, मुंढवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
- Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन
- Pune Pimpri Chinchwad Crime News | थाई स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश