Pune Pimpri Chinchwad Crime News | थाई स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – सिंहगड रोड परिसरातील एका थाई स्पा सेंटरमध्ये (Royal 19 Thai Spa Center) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitute Business) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पा च्या नावाखाली जास्त पैशाचे अमिषा दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेत होता. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) नितीन गिरमल कांबळे (वय-29 रा. वेताळबाबा चौक, नऱ्हे, पुणे) याच्या विरुद्ध आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार मनिषा सुरेश पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.18) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोड परिसरातील रानवडे पाटील प्रॉपर्टीजमधील रॉयल 19 थाई स्पा सेंटर येथे करण्यात आली.

सिंहगड रोड परिसरातील रानवडे पाटील प्रॉपर्टीज मधील रॉयल 19 थाई स्पा सेंटर येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर स्पा सेंटर येथे छापा टाकून तरुणींना ताब्यात घेतले. आरोपी स्पा सेंटरमध्ये पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व इतर वस्तू असा एकूण 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.