Pune Pimpri Chinchwad Crime News | सुपरवायझर कडून मूकबधिर तरुणीचा विनयभंग, वारजे परिसरातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | वारजे परिसरातील एका संस्थेत काम करणाऱ्या मूक बधिर (Deaf and Mute) तरुणीसोबत कार्यालयातील सुपरवायझरने गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation) केला. तसेच तिचा पाठलाग करुन आणि तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ (Porn Videos) पाठवले. हा प्रकार 13 जानेवारी 2023 ते 18 ऑगस्ट 2023 दरम्यान वारजे परिसरात घडला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Pune Police) एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत किरकटवाडी येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अजय संपत काळे (रा. संतोष नगर, कात्रज) याच्यावर आयपीसी 354 अ/1, 452, 506 तसेच अपंग व्यक्तींचा अधिकार अधिनियम 92ड, आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वारजे परिसरातील एका संस्थेच्या कार्यालयात कामाला असून तिला बोलता आणि ऐकू येत नाही. याच कार्य़ालयात आरोपी अजय काळे हा सुपरवायझर म्हणून काम करत आहे. फिर्यादी तरुणी कार्यालयात काम करत असताना आरोपीने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिचा पाठलाग करुन मोबाईलवर अश्लील मेसेज व अश्लील व्हिडिओ पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

तसेच फिर्यादी यांच्या घरी जाऊन ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे व तू माझ्याशी बोल’
असे म्हणत तिच्यासोबत अश्लील चाळे केले.
दरम्यान, 22 जून रोजी फिर्यादी कार्यालयात काम करत असताना आरोपीने कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना बाहेर
पाठवून तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.